वाडा तालुक्यातील उजेणी ग्रामपंचायत चे काकड्या जानू लहांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
दिनांक ३१,जाने.रोजी वाडा तालुक्यातील ग्रामपंचायत उज्जैनी पैकी भोकरपाडा या गावचे काकड्या जानू लहांगे आणि अनंता अर्जुन धिंडा यांनी नागली पिकात जास्त उत्पादन संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घेतले त्यामुळे त्यांना उत्कृष्ट शेतकऱ्यांना दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे मा मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांचे हस्ते देण्यात आला.
त्यावेळी नागलीचा केक कापून ” महाराष्ट्र मीलेट मिशन” चे उद्घाटन झाले. या प्रसंगी मा कृषिमंत्री श्री अब्दुल सत्तार, मा उद्योग मंत्री श्री उदय सामंत, मा प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, मा आयुक्त श्री सुनील चव्हाण व इतर आमदार उपस्थित होते. या वेळी चांगल्या आरोग्यासाठी व शेतकऱ्यांच्या फायद्या साठी सर्वांनी पौष्टिक तृणधान्य सेवन करण्याचे व त्याची प्रचार प्रसिध्दी करण्याचे आवाहन मा मुख्यमंत्री यांनी केले. या वेळी महाराष्ट्र मीलेट मिशन कार्यक्रम करिता २५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मा मुख्यमंत्री यांनी जाहीर केले. व सदरील उपक्रमास शासनामार्फत सर्व तो परी मदत करण्याचे आश्वासन दिले.ज्वारी,बाजरी,नागली पिकविणाऱ्या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा व प्रक्रिया धारक उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार खऱ्या अर्थाने सहाय्यक कृषी अधिकारी ए.एस. बेलकर साहेब आमच्या भागात आल्यामुळेच मिळाला कारण त्यांनी आमच्या भागात आल्यापासून मोठ्या प्रमाणात शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी अगदी प्रभावीपणे त्यांनी जास्तीत जास्त शेतकरी यांना लाभ मिळवून देण्यासाठी कामं केलं आहे.
असे उज्जैनी येथील माजी सरपंच बाळा लहांगे यांनी प्रतिपादन केले आणि संबंधित शेतकरी यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार मिळून दिल्याबद्दल कृषी विभाग वाडा यांचे आणि विशेष करून ए. एस. बेलकर यांचे जाहीर आभार मानतो असे शेवटी बाळा लहांगे बोलले,तसेच आदर्श शेतकरी काकड्या जाणू लहांगे,आणि अनंता अर्जुन धिंडा,तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे मॅडम,बीटीएम हरेश बांगर,व कृषी सहायक बेलकर साहेब, यांचे उज्जैनी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच प्रकाश लहांगे व माजी सरपंच बाळा लहागे यांनी सर्व प्रशासनाचे महाराष्ट्र शासनाचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानले.