दहावीची ची परीक्षा ही उज्ज्वल भविष्याची पायरी आहे.
मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी
मोखाडा - शिक्षण म्हटल्यावर मनुष्य जीवनातील एक जीवनावश्यक गोष्ट आहे. शिक्षणालामुळे मनुष्याचे आयुष्य उज्ज्वल होते असे म्हणायला हरकत नाही. शिक्षण आपण अनेक मार्गाने घेत असतो शाळेत जाऊन आणि इतर ठिकाणांहून तसेच शाळेचे शिक्षण हे मोलाचे शिक्षण असते.
अश्याच प्रकारे आजदहावी ची परीक्षा हि उज्वल भविष्याची पायरी
श्री प्रदीप वाघ
आज कर्मचारी भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोखाडा येथील दहावी च्या विद्यार्थ्यांच्या सुयश चिंतन सोहळ्यात श्री प्रदीप वाघ प्रमुख पाहुणे तथा वक्ते म्हणून बोलताना सांगितले की आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या क्षणा पैकी हा एक क्षण महत्वाचा असुन या परीक्षेला सामोरे जाताना कुठलेही दडपण न घेता परीक्षा द्यावी कारण भविष्यात आपल्याला अनेक संधी मिळतील त्याची पहिली पायरी हि परीक्षा आहे.आपण शिक्षीत तर होणारच आहेत परंतु सुसिक्षित व्हा.सुसंस्कृत व्हा.
यावेळी श्री नरेंद्र पाटील शाळा कमेटी अध्यक्ष यांनी देखील मुलांना शुभेच्छा देताना सांगितले की आपल्याला शिक्षण घेऊन आई, वडीलाचे स्वप्न पुर्ण करायचे आहेत.
प्राचार्य श्री काजळे यांनी देखील मुलांना शुभेच्छा दिल्या, यावेळी श्री शेख सदस्य शाळा व्यवस्थापन समिती.श्री नंदकुमार वाघ उपसरपंच
सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी देखिल मनोगत व्यक्त केले व शाळेस भेट वस्तू दिली.