Type Here to Get Search Results !

छञपती शिवरायांचे विचार आत्मसात करूनच तरुणांनी जीवन सार्थक करावे - डॉ तुषार देशमुख



छञपती शिवरायांचे विचार आत्मसात करूनच तरुणांनी जीवन सार्थक करावे - डॉ तुषार देशमुख

चांदुर बाजार/प्रतिनिधी :-

छञपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आदर्श राजे आहेत.393 वर्षानंतर ही तेवढ्याच जल्लोषात शिवरायांची जयंती खेडोपाड्यात साजरी होते. यामधे सर्व अठरापगड जातीचे लोक सहभागी होतात हाच खरा शिवरायांचा विचार होता.




आजचे तरुण वाचनापेक्षा मोबाईल कडे जास्त वळले आहेत. त्यामुळे तरुणांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी, वाचन वाढवावे, त्यातून तुम्हाला खरे शिवराय समजतील असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते तथा वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे संकल्पक डॉ तुषार देशमुख यांनी केले.ते विश्रोळी येथे छञपती शिवाजी महाराज जयंती प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन भवानी मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे जिल्हाध्यक्ष निखिल काटोलकर, पोलीस पाटील सौ.अनिता धोंडे,सरपंचा सौ.मनीषा इंगळे, अध्यक्ष पंजू दहिकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी डॉ तुषार देशमुख यांनी शिवरायांच्या विविध गुणांचे वर्णन करून शिवराय हे जगाला कसे प्रेरक आहेत हे सांगितले.यावेळी गावातील जिल्हा परिषद मध्यामिक शाळेतील शिक्षक, वृध्द महिला, मूकबधिर खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी लेझिम पथकाने उत्साहात पाहुण्यांचे स्वागत केले.डॉ तुषार देशमुख व निखिल काटोलकर यांनी या आयोजनाबद्दल आयोजक तरुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad