गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज पालखी सोहळा
नंदुरबार (प्रतिनिधी) आज सोमवार दि. 13 फेब्रुवारी रोजी
श्री गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
या निमित्ताने श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची पालखी नंदुरबार शहरातून निघणार आहे.
मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून श्रींची पालखी मार्गस्थ होणार आहे. सदर मार्गावर स्वच्छता राखावी आपल्या गाड्या रोडवर पार्किंग करू नयेत तसेच सडा व रांगोळी काढून महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत करावे अशी विनंती संयोजकांनी केली आहे.
श्री पालखीचा मार्ग- गजानन महाराज मंदिरापासून साक्री नाका ते सराफ बाजार - सोनार खुंट, -गणपती मंदिर -घी बाजार ,असोदेकर यांच्या दुकानावरून मारुती व्यायाम शाळा,श्री सिद्धिविनायक मंदिर - काका गणपती- शिवाजी चौक हिरालाल काका यांचे घर तेथून साक्री नाका आणि समारोप श्री गजानन महाराज मंदिर येथे होईल.
पालखी सकाळी 8 वाजता निघणार असुन पालखी समारोप दुपारी 1 वाजता होईल.पालखी समारोप झाल्यानंतर दुपारी श्री. गजानन महाराज मंदिरावर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन
आयोजक सद्गुरु सेवा संघ
श्री गजानन महाराज मंदिर
भक्त परिवार नंदुरबार यांनी केले आहे.