Type Here to Get Search Results !

कातकरी समाजाची मासेमारीवर पेटतेय चुल शेकडोनी ठोकला तालुक्याला रामराम , पोटासाठी धरली शहरीभागातील विटभट्यांची वाट .



कातकरी समाजाची मासेमारीवर पेटतेय चुल 

  शेकडोनी ठोकला तालुक्याला रामराम , पोटासाठी धरली शहरीभागातील विटभट्यांची वाट . 

अद्यापही दुर्गम भागात विकास कोसो दूर 

मुरबाड दि १२ प्रतिनिधी लक्ष्मण पवार   


 मुंबई पासून हाकेच्या अंतरावरील मुरबाड तालुका आहे ,या तालुक्यात अदिवासी बहूल वस्ती असलेल्या डोंगराळ भागात रोजगारा अभावी अदिवासी दारीद्र्यात पिचला आहे, 

 

तर कुपोषणाच्या विळख्यात कोवळी पाणगळ कायम आहे

 

    रोजगार नाही, शासकिय स्वस्त धान्य कधी मिळेल याची शास्वती नाही

 

  एकंदरीत या अदिवासी कातकरी समाजाची परिस्थिती मेळघाटा पेक्षा अत्यंत वाईट आहे, येथे सर्वच पक्षात केवळ ठेकेदारी पोसली जाऊन पक्ष वाढिवर लक्ष ठेवलं जात आहे, दुर्गम भागातील नागरिक मुलभूत समस्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते .       


      त्यातचं मुख्यत्वे रोजगारा अभावी वाड्या वस्त्या वरील हजारो अदिवासी विटभट्टयावर स्थंलातरीत झाले आहेत, कोट्यावधींच्या शासकिय निधीत केवळ आणि केवळ रस्त्यांच्या नावान चांगभलं करीत राजकिय ठेकेदारी पोसली जातेय, त्या मुळ अदिवासी बहूल भागातील पाटगाव पठार,असो की माळशेज लगतच्या अदिवासी वाड्या, आज पावेतो मुलभूत सोई सुविधांचा अभाव आहे,  




       या वाड्य वर अद्यापही रस्त्या अभावी "डोली" खांद्यांचा "आधार" घ्यावा लागतो, रोजगार नाही कुपोषणाच्या विळख्या बालकं सापडली आहेत, -,, भिषण पाणीटंचाईच्या विळख्यात ह्या वाड्या अडकल्या आहेत, रोजगारा अभावी येथील शेकडो अदिवासी घाटमाथ्यावर कांदे लागवडी साठी पहाटे मिळेल त्या वाहनाने जातात, कातकरी समाजातील कुंटूबं लुगड्याची झोळी बनवून नदिनल्यावर दिवस भर मासेमारी करतात या मासेमीरीला कातकरी समाज मासे झोळणे असे म्हणतात - येथील एकाही अदिवासी वस्तीवर आजही शासकिय योजना पोहचत नाहीत. व सोबत शासकिय मोफत धान्य ही वेळेवर मिळत नाही.   

 

हा तालुका गेल्या दहा वर्षा पासून भाजपचा ताब्यात असतांना विकासा पासून वंचित राहिल्याचे चित्र दिसून येते. माळशेज घाटालगतच्या थिदबी, भोंरांडे ,भोईरवाडी , मोरोशी, शिळंद, तागवाडी, आवळेवाडी, सावरने, करपटवाडी, अशा ३० ते ३५ वाड्यावरील नागरिकांना रोजगार नाही. उपजिविकेसाठी अर्थिक चणचण भासत असल्याने अदिवासी महिलांचे पाय जंगलातील वाळलेल्या लाकूड फाट्याकडे वळले आहेत., लाकडाची मोळी विकल्यावर घरातील चूल पेटते तर कातकरी समाजाची मासेमारीवर चुल पेटते असे भयानक वास्तव या परिसरांत आहे.,या अतिदुर्गम भागात रोजगारच नसल्याने या कुंटूबांचे जगणेदेखील मुश्कील झाले आहे  

 

.दिवस भर केलेली मासेमारी संध्याकाळी या महिला टोकावडे धसई सरळगाव किंवा गोवोगावी पळसाच्या पानावर वाटे मांडून विकतात याला "केजी" विकणे असे म्हणतात हि केजी विकून झाली की त्यावर संध्याकाळची चूल पेटते या आलेल्या पैशावर कुंटूबाचा राहट गाडा रोजच कसरत करून चालवला जातो, या घटकासाठी आलेल्या योजना वेळीच त्या पर्यत पोहचल्या असत्या तर केवळ जगण्याची धडपड जिवांची परवड थांबली असती. या वाड्यापाडयावर धुरळा उडतो ते फक्त राजकिय मतलबा पोटी. ईतर दिवस त्यांचे कोणालाही सोयर सुतक नाही .. 


 शहरा लगतच्या रस्त्यावर डांबर टाकून विकासाच चित्र रंगवले जात असले, तरी खरं चित्र पहावयांच असल्यास वाड्या वस्तीवर फेर फटका मारायला हवेच, सर्वसामान्य नागरिक मुलभूत सोईसुविधा पासून कायम वंचित राहिल्याचे चित्र ग्रामिण भागातील भिषण दारिद्रया वरून दिसून येते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad