Type Here to Get Search Results !

श्री गुरु माजीद पैठणकर वारकरी संप्रदायाच्या सन्मानाने मंत्रमुग्ध



श्री गुरु माजीद पैठणकर वारकरी संप्रदायाच्या सन्मानाने मंत्रमुग्ध

 

 माजी आमदार गोटरामभाऊ पवार यांच्या हस्ते महावस्त्र, नारळ पुष्पहार देऊन माय भूमीत यथोचित सन्मान




मुरबाड 12 प्रतिनिधी  लक्ष्मण पवार 

 

 अत्यंत अल्पवयात ज्याचा कार्याची ख्याती अवघ्या जगभर पसरली.आणि याच उल्लेखनीय कार्याची दखल अनेक,सेवाभावी संस्था, संघटनांना घ्यावी लागली. आणि त्यांच्या किर्तीचा गौरव करावा लागला.त्या महाराष्ट्र रत्न गुरु माजीद पैठणकरचा काल मुरबाडच्या जन्म भुमित वैकुंठवासी परमपूज्य श्रीराम गजानन जोशी दादा यांच्या आशीर्वादाने व मुरबाड तालुका भागवत वारकरी सांप्रदायिक समाजसेवा मंडळ व वैष्णव भूषण हभप श्री प्रमोद महाराज जगताप यांच्या कडून मुरबाड मधील श्रीगुरू माजीद साजीद पैठणकर यांचा माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या हस्ते महावस्त्र पुष्पहार नारळ प्रदान करून सन्मान. करण्यात आला. 

 


 मुरबाड शहरातील दानशूर व्यक्तीमत्व असलेले मेहबूब पैठणकर यांचे नातू श्रीगुरु माजीद साजीद पैठणकर हे अमेरिकन कौन्सिल ऑफ ट्रेनिंग अँन्ड डेव्हलपमेंट संलग्न असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरप्रेन्युअरशिप अँड मँनेजमेंट स्टडीज या संस्थेत शिक्षण घेत होते. यावेळी त्यांनी जगातील वेगवेगळ्या धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांनी वेगवेगळ्या धर्मातील २४ देवतुल्य व्यक्तिरेखांचा अभ्यास करून सर्वामध्ये एकच तत्व व भाव असल्याचे निरिक्षण नोंदविले. त्यांच्या 'आध्यात्मीकता ' या विषयाबद्दल त्यांना डॉक्टरेट या उपाधीने सन्मानित केले गेले आहे 




. श्रीगुरु डॉ. माजीद पैठणकर यांनी आपल्या झरिया इंटरनॅशनल ऑरगनायझेन या संस्थेद्वारे गरिब, अनाथ लहान मुलांसाठी सुरू केलेल्या महान कार्याची दखल घेऊन महासेवा व रेड अन्ट संस्थेने उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, आ.मंगलप्रभात लोढा, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते ' महाराष्ट्ररत्न ' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यापुर्वीही श्रीगुरु डॉ. माजीद पैठणकर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ग्लोबल अँम्बेसडर ऑफ पिस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजिद पैठणकर हे मुरबाडकरांचा सार्थ अभिमान असून त्यांना मिळालेल्या मानाच्या पुरस्काराने मुरबाडच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला असल्याच्या प्रतिक्रिया या प्रसंगी मान्यवरांनी दिल्या.




             श्रीगुरु माजीद पैठणकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व धर्माचे ग्रथ हे एकच आहेत कुराण ,बायबल, गीता ,हे सर्व वाचल्यास कळेल की हे सर्व एकच आहेत .त्यामुळे तुमचा माझा सर्वाचा देव एकच आहे आमच्या तरुण पिढीने पुढे जाऊन प्रगती करावी .पण आपली परंपरा विसरू नये. असे त्यानी मार्गदर्शन करताना सांगितले 


     मुरबाड मध्ये गेल्या २६ वर्ष निरंतर सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात मोठया भक्तीमय वातावरणात हरिपाठ, काकडआरती,श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,महिला भजन व कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मध्ये सर्व वारकऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास करणाऱ्या श्रीगुरू माजिद पैठणकर यांचा सत्कार करण्यात आला. तर या वेळी त्यांचे आजोबा दानशूर व्यक्तीमत्व मेहबूबभाई पैठणकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

        या प्रसंगी मा. आमदार गोटीरामभाऊ पवार, मुरबाड ग्रामपंचायतीचे मा. सरपंच खंडूदादा मोरे, नंदाभाऊ रोठे, शांताराम बांगर, लक्ष्मण सरनिंगे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद भंडारी,सूर्यकांत बाळाजी भगत इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad