तळोदा महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरारांगोळी प्रदर्शनातून वैज्ञानिक संदेश
तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम हा विज्ञान दृष्टिकोन ठेवून विविध प्रकारच्या कला प्रकारातून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संदेश महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व सर्व घटकांना दिला प्रथम द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी फुलांच्या रांगोळ्या तसेच रंगांच्या रांगोळ्या काढून कला प्रदर्शन भरविले व सर्वांचेच लक्ष वेधून घेत विविध प्रकारच्या रांगोळ्यांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. एस. एन. शर्मा तसेच उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रा सुधीरकुमार माळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेंद्र एच. माळी यांनी केले प्रमुख वक्ते म्हणून पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख एस. आर. गोसावी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाबद्दल मार्गदर्शन केले व सी व्ही रामन यांनी केलेल्या कार्याच्या उजाळा दिला.
सदर रांगोळी प्रदर्शनात 36 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला त्यात प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांकास प्राचार्यांकडून पारितोषिक देण्यात आले प्रथम क्रमांक कुमारी दिव्या कदम व सीमा मराठे यांना रोख 501रु पारितोषिक देण्यात आले द्वितीय क्रमांक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र माळी यांच्याकडून कामिनी पाटील व हर्षदा पटेल यांनाही 501 रुपये रोख पारितोषिक देण्यात आले तसेच द्वितीय क्रमांक दिव्या दिनेश मगरे हिला रोख पारितोषिक 501 रुपये प्राध्यापिका सुनीता गायकवाड यांच्याकडून देण्यात आले तृतीय क्रमांक रोशनी कोळी तृतीय वर्ष विज्ञान या विद्यार्थिनीला 301 रुपये पारितोषिक प्रा डॉ एस आर गोसावी यांच्याकडून रोख देण्यात आले. कार्यक्रमा त पदवी व पदियंतर वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमास प्रा. डॉ. एस. बी. गरुड प्रा. डॉ. आर. एम. भदाणे प्रा. डॉ. एस. के. श्रीवास्तव प्रा. डॉ. मोहन वसावे प्रा. डॉ. जे. एन. शिंदे कार्यालयीन अधीक्षक वाय. एच. पंजराळे वरिष्ठ लिपिक राजेंद्र हिवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा सुनीता गायकवाड सौ पल्लवी माळी प्रयोगशाळा सहाय्यक अश्विन कुमार मगरे, शिवदास प्रधान रवी पाडवी, हरीश राजपूत आदींनी परिश्रम घेतले