Type Here to Get Search Results !

तळोदा महाविद्यालयात शिव व्याख्यान संपन्न



तळोदा महाविद्यालयात शिव व्याख्यान संपन्न



कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त औचित्य साधत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शिव व्याख्यान आयोजित केलेले. होते सदर व्याख्यानासाठी धनदाई महाविद्यालय अमळनेर येथील प्रा डॉ .लीलाधर पाटील हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते.




तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस .एन. शर्मा यांनी स्वीकारले .सदर कार्यक्रमासाठी शहादा विभागीय समन्वयक ,डॉ. आर. डी मोरे तसेच महाविद्यालयातील डॉ .एस बी गरुड ,डॉ. एस आर गोसावी डॉ .एच.डी सावंत डॉ .प्रशांत बोबडे ,डॉ मोहन वसावे, डॉ जी.एम मोरे ,डॉ एस आर चव्हाण प्रा मुकेश जावरे ,प्रा .के एस,बेडसे, डॉ आर. एल .राजानी,प्रा राजू यशोध ,प्रा जे.के पिंपरे तसेच मनीष कलाल आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. लीलाधर पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवाजी महाराजांचे विचार आजच्या काळात कसे सुसंगत आहेत हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले .तसेच प्रा जे.एन.शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची तोरण कशा पद्धतीने वाढविले हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवीका जयश्री पाडवी तिने केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रा. पंकज सोनवणे त्यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पराग तट्टे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad