पटवर्धन कुरोली चिंचकर वस्ती शाळा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिमेचे पूजन बापूसाहेब भांगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे ड्रेस परिधान करून प्रभात फेरी वाढीवस्तीवर काढण्यात आली. शिवाजी महाराजांवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी भाषणे संपन्न झाली या शाळेतील मुख्याध्यापक सोनवणे सर व बोबडे सर यांनी या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित दीपक नाईक नवरे ज्ञानेश्वर जवळेकर भजनदास नाईक नवरे ज्ञानेश्वर उपासे आदींनी हजेरी लावली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती येथील सर्व सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच शिक्षकांचे कौतुक मोठ्या प्रमाणात करण्यात आले शिवजयंतीचा उत्साह खूप आनंदमय वातावरणात पार पडला,