वाखारी येथे शिवजन्मोउत्सव मोठ्या उत्साहात साजरा
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी ता देवळा येथे शिव शिवजन्मोउत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वाखारी येथे छत्रपती शिवाजी महाराज जंयती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले रविवार दि. १९ फ्रेब्रुवारी पाहटे भव्य फटाके अतिषबाजी करण्यात आली रोजी सकाळी ७ वा महारांजांची अभिषेक करून पुजा करण्यात आली तसेच सर्वप्रथम विदर्याथांनी प्रतिमा पुजन करून ग्राम पंचाय सदस्य यांनी महाराजांचे पुजन व प्रतिमेला नारळ वाढवुन सर्वांनी महाआरती करण्यात आली नंतर सांस्कृतीक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी गुरुकूल इग्लिंश मेडीयम स्कृल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळेश्वर विद्यालय कापराई प्रार्थामिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल आयोजीत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला शिवजन्मोउत्सव सोहळा निमित्त रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आला व ६ वा महारांजांची भव्य रॅली व मिरवणूक आयोजित करण्यात आले होते
या भव्य दिव्य कार्यक्रमाचे रूपरेषा व सुत्रसंचलन गुरुकूलच्या संचालिका बिना निकम यांनी केले तर आभारप्रदर्शन
शिवजन्मो उत्सव समितीमार्फत करण्यात आले यावेळी वाखारी ग्रामस्थ महीला आबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते