विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याच्या मृत्यू नंतर दहिवड येथे गिरजा अभियान देवळा संस्थेच्यावतीने पालकांना मदतीचा हात
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील दहिवड येथील जिजामाता विद्यालयातील माजी स्वर्गीय विद्यार्थी राकेश ठाकरे याचे नुकतेच अपघाती दुःखत l निधन झाले.
या वतीने आज गिरीजा अभियान देवळा संस्थेच्या अध्यक्षा,देवळा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा व लोहणेर जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या सौ.धनश्रीताई केदा आहेर यांनी श्री.आनिल ठाकरे व रेखा ठाकरे यांचे सांत्वनासाठी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.याप्रसंगी जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड कडून दहा हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या परीवाराकडे सुपूर्द करतांना सौ.धनश्रीताई आहेर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुनील शिंदेसर आणि शिक्षक व शिक्षकेतर बांधव तसेच श्री.वामन ठाकरे, पालक
सर्वश्री जिभाऊ पिंपळसे, श्री.साहेबराव ठाकरे आदी उपस्थित होते.
राकेश हा अतिशय आज्ञाधारक व चुणचुणीत विद्यार्थी होता.त्याच्या वडीलांचा अपघात झाल्याने घराची सर्व आर्थिक जबाबदारी राकेश वरच होती. तो त्याच्या परीने त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता.पंरतू दुर्दैवाने काळाने घाला घालून त्याला आपल्यातुन हिरावून नेले.घराची परीस्थिती बेताची असल्याने त्याच्या कुटुंबाला थोडा हातभार लावावा आणि गावातुन सुध्दा मदतीचा ओघ सुरुच आहे त्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा हा ऊदात्त हेतु ठेवुन सदर दहा हजार रुपयांची आर्थिक मदत आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.