तळोद्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपात सहभाग
तळोदा महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. संपाला पाठिंबा दर्शवत अध्यापक शिक्षण मंडळाद्वारा संचलित येथील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व स्थानिक शिक्षकेतर कर्मचायांनी सहभाग घेत, शंभर टक्के कामबंद आंदोलन यशस्वी केला. या वेळी कार्यालयीन अधीक्षक वाय. एच. पंजराळे, स्थानिक अध्यक्ष आर. पी. हिवरे, नंदूरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एम. आर. कलाल, ग्रंथालय लिपिक एस. यू. केदार, स्थानिक सचिव श्री. पवनकुमार शेलकर यांच्यासह एस. व्ही. सामुद्रे, आर. टी. मगरे, एस. एस. प्रधान, आर. आर. पाडवी, वाय. पी. पिंपरे, ए.डी. मगरे, पी. एल. पाटील, बी. के. मराठे, आर. एन. पाडवी आदी कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन परिसरात धरणे आंदोलन करीत आपल्या मागण्या पूर्ततेसाठी वरिष्ठ पातळीवर निवेदने सादर केली आहेत.