राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने आशिष बारी सन्मानित
तळोदा :- राष्ट्रभक्ती जनविकास संघटना भारत आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारा राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते आशिष बारी यांना प्रदान करण्यात आला आहे.
आशिष बारी यांनी जिल्ह्यातील विविध प्रकारचे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत उल्लेखनीय सामाजिक कार्याबाबत
राष्ट्रभक्ती जन विकास संघटना, भारत आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारा "राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव" या पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले आहे. आशिष बारी यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांना मित्र परिवाराच्या वतीने सोशल मीडियातून राजकीय नेतेमंडळी, उद्योजक,नातेवाईक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.