पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बालसंस्कार केंद्र चोपडा
चोपडा: आज दिनांक:- 21-02-23 रोजी बाल विभागात क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या दिनांक 21-02-23 ते 24-02-23 पर्यंत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे.आज धावणे ही स्पर्धा घेण्यात आली त्यात मोठ्या गटातून 1).आरव राहुल कोळी, 2)वेदांत परेश ठाकरे ह्या मुलांनी बाजी मारून प्रथम क्रमांक मिळवला.
उद्घाटनासाठी मुख्याध्यापक नानासो. एम. व्ही. पाटील सर, विभाग प्रमुख सौ. रेखा पाटील मॅडम व पालक प्रतिनिधी म्हणून एस.एन.चौधरी सर, श्री.विवेक पाटील, श्री. अविनाश वानखेडे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडला व स्पर्धेला सुरुवात झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मीना माळी, श्रीमती.छाया बारी,सौ.भावना दीक्षित, सौ.संध्या पाटील,सौ. जयश्री हिंगे, सौ. योगिता कोळी, श्रीमती.अनिता बऱ्हाटे व सौ.सुनंदा विसावे यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्यासाठी सहकर्मचारी नंदा पाटील, ज्योती माळी, विजय सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.