महिन्याचा पहिला शनिवार सर्वांगीण स्वच्छता मोहीम राबविणार
तळोदा तालुक्यात आरोग्य केंद्रात स्वच्छता
तळोदा तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रवर आरोग्य स्वच्छता दिवसानिमित्त सर्व केंद्र स्वच्छता करण्यात आली
नंदुरबार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, यांचे आदेशान्वये व तळोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण वगट विकास अधिकारी पी.पी.कोकणी यांचे मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्र बोरद, प्रतापपुर, सोमावल, वाल्हेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सायसिंग पावरा,डॉ.पंकज पावरा डॉ. सुधिर ठाकरे व डॉ. राकेश पावरा यांच्या उपस्थितीत प्रा. आ.केंद्र ०५ व उपकेंद्र २७ व प्राथमिक आरोग्य पथक ०६ असे एकूण ३८ आरोग्य संस्थेत एकाच दिवशी सर्वांगीण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसर स्वच्छता आंतररुग्ण विभाग, स्वछतागृह भांडार विभाग स्वछता करण्यात आली. कॉरीडोअर शस्त्रक्रीया गृह, निर्जंतुकीकरण करण्यात आले.
प्रसूतीगृह, बाहयरुग्ण विभाग स्त्री, पुरुष विभाग ,माहेर घर इ. ठिकाणी स्वच्छता करून आरोग्य विषयक संदेश असलेले फलक लावण्यात आले.
अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे कडील प्राप्त आदेशानुसार महिन्याचा पहिला शनिवार रोजी वरिल मोहीम घेण्यात येणार असून यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे आरोग्य सोई सुविधा उत्तम रित्या देण्यात येतील यामुळे लोकसहभाग वाढून आरोग्य सेवा गुणवत्तापूर्वक गरजू लोकापर्यंत पोहचणार आहे.
दरमहिन्याला सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा संपूर्ण सहभाग घेऊन त्या दिवशी स्वच्छता, निर्जंतुकीकरण व कार्यालयातील कागदपत्र व दप्तर यांची विगतवारी व निर्लेखीकरण करण्यात येणार आहे.
या मोहीमेत NSS स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी माहिती दिली.