चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन
इंडिया न्युज प्रतिनीधी
पुणे दि ४:-२०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगाव फाटा ते तापकीर चौक दरम्यान मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीत थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून नागरीकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.
यावेळी या रॅलीमध्ये निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती श्वेता आल्हाट, विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड, क्रीडा शिक्षक हनुमंत सुतार, बाळाराम शिंदे आदी उपस्थित होते.
प्रतिनीधी:-अभिषेक जाधव