Type Here to Get Search Results !

जव्हार मोखाडा तील नागरिकांचे रोजगारासाठी आदिवासी कुटुंबियांचे स्थलांतर गावच्या गाव झाली ओस.



जव्हार मोखाडा तील नागरिकांचे रोजगारासाठी आदिवासी कुटुंबियांचे स्थलांतर गावच्या गाव झाली ओस.


" झोपड्यांना काटे कुटे लावून, दारे बांधून नागरिकांनी धरली शहरांची वाट."


 पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर 


                   जव्हार मोखाडा तालुक्यातील आदिवासी समाजाचे रोजगारासाठी अन्य जिल्हे व शेजारच्या राज्यांत स्थलांतर, पावसाळी शेतीची कामे व पीक कापणी पूर्ण झाल्या नंतर व त्यात तुटपुंजी शेती, डोंगराळ भाग, पाणी साठवण -सिंचनाच्या सोयी नाही, असा मुळे रोजगारासाठी अन्य कामच नसल्याने आदिवासी कुटुंब आपली घरे सोडून बाहेर शहराकडे स्तलांतर होत असून हे सत्र सुरूच आहे. केंद्र व राज्य सरकारकडून रोजगारासाठी अनेक योजना जाहीर होतात. मात्र मनरेगा वगळता अन्य कोणतीही योजना आदिवासींपर्यंत पोहोचलेली नाही. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव प्रत्येक वर्षी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार शोधण्याकरिता भटकंती करावी लागते.त्यामुळे झोपड्यांना काटे कुठे लावून , दारे बांधून नागरिकांनी धरली शहराची वाट याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.




                   ग्रामीण आदिवासी बांधव आर्थिक हालाखीत व दारिद्र्यात जीवन जगतो त्यातच त्याच्या हाताला काम नसल्याने आपल्यासह कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा, असा प्रश्न श्रमिकांना भेडसावू लागत असून. दोनशे ते तीनशे रुपये रोजंदारीवर शेवटी मिळेल ते काम करून पैसे मिळविण्याचा प्रयत्न हे नागरिक करीत आहेत. जिल्ह्यात मनरेगामधून रोजगार हमी मिळत असली तरी यातून मिळणारी मजुरी अल्प आहे व ती मजुरी वेळच्या वेळी मिळत नसल्याने याकडे ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांचा कल कमी आहे. त्यात बऱ्याच योजना ह्या कागदावरच राबविल्या जातात, आदिवासी विभागासाठी आलेला निधी परत जातो, नाहीतर इतरत्र पाळवीला जातो या व असा अनेक करणा मुळे नगरिकांना स्थलांतर करावे लागत आहे.

             या रोजगारासाठी स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असून. गावे रिकामी होत असल्याने शाळासुद्धा ओसाड पडण्याचा धोका निर्माण होत आहे. या सर्व गंभीर बाबी कडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी या कडे गंभीर्याणे लक्ष देवून स्थानिक रोजगार निर्मितीला भर देवून नागरिकांच्या हाताला काम द्यावे जेणेकरून हे होत असलेले स्थलांतराला आळा घालता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad