Type Here to Get Search Results !

धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना " इन्स्पायर पर्सनालीटी पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले



स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्यतर्फे सरदार रणजितसिंघ कामठेकर

यांनी घेतलेल्या समारोहात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना " इन्स्पायर पर्सनालीटी पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले. दिलीप ठाकूर यांचा हा ७७ वा पुरस्कार असल्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.


जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील नियोजन भावनात झालेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सन्मानाच्या च्या वेळी नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी,गुरुद्वाराचे मिथ जत्थेदार संतबाबा ज्योतीदरसिंघजी, माजी मंत्री भास्करराव खतगांवकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सरदार 

रणजितसिंघ कामठेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व त्यांच्या समाज कार्याला ३५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. प्रतिमा पूजेनंतर प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष गोपाळ पाटील इजळीकर यांनी कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.संतबाबा ज्योतीदरसिंघजी, भास्करराव खतगांवकर, ओमप्रकाश पोकर्णा, योगेश पाटील, माजी न्यायाधीश परमज्योतसिंघजी चाहेल, स्वच्छता दूत माधवराव शेळगावकर यांची समायोजित भाषणे झाली.कार्यक्रमाचे अतिशय रंगतदार सूत्रसंचालन करणारे प्रा. ऋषिकेश कोंडेकर यांनी वर्षभरात जगावेगळे ७८ उपक्रम राबविणारे दिलीप ठाकूर यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन पुरस्कार घेण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर संतबाबा बलविंदरसिंघजी, संतबाबा ज्योतीदरसिंघजी यांच्या हस्ते ॲड. ठाकूर यांना स्मृती चिन्ह,सिरोंपाव , पुष्पहार देऊन " इन्स्पायर पर्सनालीटी पुरस्कार " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी मोठया संख्येने उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी टाळ्याच्या कडकडाट करत कौतुक केले. दिलीप ठाकूर यांना ७७ वा पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार सुधीर प्रधान, प्रतिष्ठित उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा, लायन्स अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा, दिनेशसिंह ठाकूर, सविता काबरा यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad