Type Here to Get Search Results !

चांदूरबाजार येथे विदर्भस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न !



चांदूरबाजार येथे विदर्भस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न ! नागपूर, पुसद व अमरावती चे स्पर्धक विजयी

प्रतिनिधी......छत्रपती शिवाजी महाराज जयंती पर्वावर विदर्भस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले होते. वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, तालुका शारीरिक शिक्षक संघटना, तालुका डॉक्टर्स असोसिएशन, गो. सी टोम्पे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामधे एकूण दोनशे तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला.




यावेळी प्रथम क्रमांक चे अकरा हजारांचे बक्षीस नागपूर येथील सुरजित राजभर,द्वितीय क्रमांकाचे पाच हजारांचे बक्षीस राजन यादव नागपूर,तृतीय क्रमांकाचे तीन हजारांचे बक्षीस छगन बोंबले अमरावती,व प्रोत्साहनपर बक्षीस रोहित कदम पुसद याला मिळाले.त्याचप्रमाणे लहान गटातून वेदांत कुरळकर, सुमित खेरडे, अंकुश आमझरे, आर्यन सगणे यांना मिळाले. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन चांदूरबाजार चे ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गो.सी टोम्पे महाविद्यालय ट्रस्ट चे सचिव तथा मॅरेथॉन चे स्वागताध्यक्ष भास्करदादा टोम्पे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद राऊत, तालुका डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ मुकुंद मोहोड, सचिव डॉ हेमंत रावळे, शरद क्रीडा प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष नंदकुमार बंड, प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके,शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हा सदस्य बबलू देशमुख, तालुका अध्यक्ष प्रवीण पारधी, पोलीस उपनिरीक्षक वैभव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंगाडे,डॉ ललित चव्हाण, जेष्ठ पत्रकार मदन भाटे, आयोजन समिती अध्यक्ष डी आर नांदुरकर, कार्याध्यक्ष पंकज उईके, प्रवीण मोहोड, राजेश वानखडे स्पर्धेचे मुख्य संयोजक तथा वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ तुषार देशमुख, युवा दिग्दर्शक चंद्रशेखर तरारे उपस्थित होते.  

 यावेळी सेवा निवृत्त शारीरिक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला यामधे डी आर नांदुरकर, सुधीर गुजरकर, राजेंद्र ठाकरे, किरण सोनार, सुभाष पटवर्धन यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.स्पर्धेत विविध गटातील विद्यार्थ्यांना सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

यावेळी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती चे प्रतिक देशमुख, महेंद्र वाहने, अभिषेक अवसरमोल, निखिल काटोलकर, प्रतिक काटोलकर, संयोग निंभोरकर, श्रेयस बर्वे, अक्षय पांडे, मंदार गुडधे, सदाशिव देवताळे, धीरज राणे, डॉ.भूषण काळे, डॉ.प्रेरित ताथेड यांचे सहकार्य लाभले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ तुषार देशमुख, आभार निखिल काटोलकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad