भाजपा शहराध्यक्ष योगेश भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व कपडे वाटप कार्यक्रम संपन्न
तळोदा - येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा मनुदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.योगेशभाऊ प्रभाकर चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नंदुरबार येथील जनकल्याण रक्तपेढी यांनी रक्त संकलनाचे काम केले.यावेळी 455 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.रक्तपेढीचे संचालक डॉ.किशोर लालचंदानी यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले की,रक्तपेढीच्या स्थापनेपासून तर आज पर्यंत च्या इतिहासामध्ये एका दिवसात 455 रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्याचा हा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ऐतिहासिक रक्त संकलनाचा विक्रम झाला आहे.दरम्यान रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मा.डॉ.सुप्रियाताई विजयकुमार गावित यांनी केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री.राजेशदादा पाडवी, माजी आमदार श्री.शिरिषदादा चौधरी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.प्रभाकर संभू चौधरी, ज्येष्ठ संचालिका सौ. रत्नाताई प्रभाकर चौधरी , माजी नगराध्यक्ष श्री.अजय परदेशी, किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस श्री शाम राजपूत, माजी उपनगराध्यक्ष सौ. भाग्यश्री योगेश चौधरी, किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ.किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष श्री.जगदीश संभु चौधरी, आत्मनिर्भर भारत अभियानाचे जिल्हाध्यक्ष श्री.कैलास प्रभाकर चौधरी, जिल्हा संघटन महामंत्री श्री.निलेश माळी जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री.हर्षल पाटील, जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक श्री.हेमलाल मगरे, माजी नगराध्यक्ष सौ.वंदना मगरे, श्री.सुरेश गुलाल माळी, माजी तालुकाध्यक्ष श्री.विलास डामरे,पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष श्री.गिरधर सागरओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीप शेंडे,युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री.शिरीष माळी, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री.दीपक चौधरी,श्री सतीश वळवी,इंजि. रुपेश कैलास चौधरी,डॉ. दर्शन योगेश चौधरी माजी नगरसेवक श्री.रामानंद ठाकरे श्री.अमानुद्दीन शेख सौ.अंबिका शेंडे श्री.हिरालाल पाडवी,श्री.गौरव वाणी,श्री.दीपक पाडवी, श्री.नितीन पाडवी, माजी मुख्याध्यापक श्री.दगडू गोरख चौधरी, मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण गोरख चौधरी,संचालक श्री.कल्पेश जगदीश चौधरी,अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस अंबालाल साठे शहराध्यक्ष जीवन अहिरे,गबाअहिरे,संभा आहिरे आदी उपस्थित होते.
सकाळी आठपासूनच रक्त संकलन करण्याचे काम सुरू झाले .दरम्यान कार्यक्रमात डॉ. सुप्रिया गावित यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात मार्गदर्शन करताना योगेश चौधरी यांना विकासात्मक तसेच राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी चा ठसा उंटवत असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्यात. दरम्यान सकाळी अकरा वाजता शहरातील नगरपालिकेत कार्यरत असलेले ८० सफाई कामगार बंधू-भगिनींना कपडे वाटप करण्यात आले यात ५० पुरुष व 30 महिलांचा समावेश होता. पुरुषांना स्नेहरुपी ड्रेस प्रथम महिलांना साडी वाटप करण्यात आले दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांचा ओघ सुरू होता.