Type Here to Get Search Results !

शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा सोन खु ॥ व ग्रामपंचायत खडक्या यांचा संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा बांधण्यात आला.



शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा सोन खु ॥ व ग्रामपंचायत खडक्या यांचा संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा बांधण्यात आला.




 धडगांव तालूक्यातील सोन बु , खडक्या व भानोली या गावाचा सीमेवर वाहणाऱ्या 'खाट ' नदीवर श्रमदानातून 1500 गोणीचा सहाय्याने वनराई बंधारा बांधण्यात आला.




बंधारा निर्मिती करीता एकूण 1500 गोण्याचा वापर करण्यात आला होता. या वनराई बंधाऱ्यामुळे 6 टीबी / लीटरपेक्षा जास्त पाणी साठवण्याची क्षमता या बंधाऱ्यामध्ये आहे.सदर बंधाऱ्यामुळे उन्हाळया मध्ये सोन- भानोली , खडक्या गावातील शेतीसाठी व पिण्याचा पाण्यासाठी आणि विशेषतः पाळीव प्राणी गुरं -ढोर, पशु, आदि जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी सोय होणार आहे. हा बंधारा बांधण्यासाठी विशेषता शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा सोन खु ॥ चे मुख्याध्यापक बि. सी. पावरा आणी ग्रामपंचायत खडक्या चे सरपंच नवलसिंग वळवी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.




वनराई बंधारा बांधण्यासाठी शासकीय आश्रमशाळा सोन खु ॥ चे कर्मचारी आर. यू. अहिरे ,टि. पी. पावरा,जी. जे. पैठणकर ,एल. के. पावरा , ओ. के. पावरा, वसावे सर , एस. ओ. पावरा, कविता मॅडम , करिश्मा मॅडम तसेच ग्रामपंचायत खडक्या चे सदस्य राशा पावरा , नरेश पावरा , रमेश पावरा, जोमसा पावरा, बारक्या महाराज ,डेबा पावरा, सागर पावरा आदी सोन बुद्रुकच्या ग्रामस्थांसह शाळेतील विध्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News