आंबा व काजू फळबाग साठी औषधे उपलब्ध करून द्यावी प्रदीप वाघ
मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी
विक्रमगड - दरवर्षी ऋतु वातावरणा प्रमाणे शेतकरी वेगवेगळ्या फळ बागांची लागवड घेत असतात आणि घेतली जात असते त्यामधील आंबा आणि काजू या फळांची मोठ्या प्रमाणात लागवड करून आणि त्याचा मोबदला घेतला जातो.
त्याच प्रमाणे या वर्षी च्या हंगामात काजु व आंबा फळझाडांना चांगला मोहर आला असुन, हवामानात बदल न झाल्यास या वर्षी चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे. मोहारा वरील किड नियंत्रण करण्यासाठी औषध फवारणी करणे गरजेचे आहे. तरी या अनुषंगाने फवारणी करून त्याची चांगली निगा राखली तर योग्य रीतीने उत्पन्न मिळू शकतो.
म्हणून त्यासाठी जर कृषी विभागाने अनुदान तत्वावर औषधे उपलब्ध करून दिली तर फळबाग शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली आहे.