वाखारी येथे भव्य श्री राम बालजी मंदीर व मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजीत
जिल्ह्यातील अनेक संत मंहत महाराजांची हजेरी
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी येथे अति प्राचीन श्री राम बालाजी मंदिराचे ब्रम्हलीन मंहत श्री श्यामलदास तसेच गुरु कमलदासची महाराज यांच्या इच्छा पुर्ती निमित्ताने वाखारी येथे भव्य दिव्य श्री राम बालाजी मंदीर तसचे मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा मंहत श्री रामप्रसाददास गुरु कमलदास सजी यांच्या कृपा आशीर्वादाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम प्रायश्चितप्रयोग शोभा यात्रा गणपती पुजन पंचकर्म अग्नी पुजन मंडळ देवतास्थापन ग्रह होम जल अधिवास सांय पुजन ध्यान निवास अभिषेक शांती होम बाल रामचंद्र भद्र महापुजा प्रतिष्ठा होम ध्वजारोहण उत्तर पुजा बलीदान पुर्णाहुती आरती तसेच महा प्रसाचे आयोजन करण्यात आले.
या पाच दिवस चाललेल्या भव्य दिव्य कार्ययक्रमात मंहत उपस्थितीत रामकिशोर दास शास्त्री दिंगबर आखाडा नाशिक राम सेनहीन दास महाराज नाशिक लक्ष्मी नारायन आखाडा श्री क्षेत्र नाशिक अध्यक्ष श्री आदय संत महंत मंडळ श्री क्षेत्र नाशिक रामेश्वर दासजी महाराज मालेगाव गणेशा नंद पुरी महाराज देवदरा श्री मंहत बागलाण कसमादे देवळा तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक साधुसंत संत महंत पुजारी वाखारी ग्रामस्थ उपस्थीत होते या धार्मीक काळात वाखारी गावात कुंभ मेळाव्याचे स्वरूप र्निमाण झाले होते.