महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद बाबत चे निवेदन ग्राम रोजगार सेवक संघटना तळोदा यांच्या मार्फत पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना देण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की
महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचे दि 30 डिसेंबरपासून पुकारलेल्या काम बंद संपावरून दि ०२ फेब्रुवारी रोजी लावण्यात आलेली मंत्रालयातील बैठक या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे पुन्हा 15 दिवसांनी बैठकीचे आयोजन करण्यात येईल रा.हो.यो मंत्री संदीपन भुमरे, रोहयो सचिव नंदकुमार यांनी तोंडी आश्वासन दिल्यावरून मंत्र्यालयातील बैठकीचे आयोजन होई पर्यंत व लेखी स्वरूपात शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचा पुकारलेला संप कामबंद राहील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा अध्यक्ष रुपसिंग चौधरी,तालुका अध्यक्ष रायसिंग पाडवी,उपाध्यक्ष कुशाल पावरा सचिव,मगन पाडवी,राजू मगन पाडवी, श्रीराज श्रीराम पाडवी,प्रवीण दारासिंग ठाकरे ,किसन परसा मोरे आदींच्या सह्या आहेत