तळोदा येथील पोलीस ठाण्यात नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अक्कलकुवा उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर तसेच पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते. सदर वाचनालयात महापुरुषांचे, स्पर्धा परीक्षेचे पुस्तके ठेवण्यात आले असुन सदर वाचनालयाचा फायदा पोलीस अधिकारी, अंमलदार यांना व त्यांच्या मुलांना होईल असा विश्वास वेक्त केला. यावेळी पोलीस ठाण्याची पाहणी करण्यात अली व पोलीस ठाण्याच्या गुन्हे आढावा घेण्यात आला.