Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय भिमाई स्मारकाच्या रस्त्याची समस्या सोडविणार - जितेंद्र आव्हाड.



भिमाई भुमी आंबेटेंबे येथे महामाता भिमाई यांची जयंती जल्लोषात साजरी ! 

 

आंतरराष्ट्रीय भिमाई स्मारकाच्या रस्त्याची समस्या सोडविणार

- जितेंद्र आव्हाड. 

 


मुरबाड दिनांक 14 प्रतिनिधी लक्ष्मण पवार 


:- ज्या मातेने ज्ञानाचे प्रतीक असलेल्या विद्वान पुरुषाला जन्म दिला.त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्रीचे जन्म स्थळ असणाऱ्या आंबेटेंभे येथे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले असले तरी त्या स्फुर्ती स्थळाकडे जाण्यासाठी सरकार रस्ता देऊ शकत नाही ही खेदाची बाब आहे. 




 या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या रस्त्यासाठी तात्काळ रस्ता कसा होईल यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुरबाड मध्ये दिले.त्यांचे समवेत रिपाईचे ठाणे जिल्हा प्रदेशाध्यक्ष बाळाराम गायकवाड, आरपीआय मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र जाधव ,भाऊ रातांबे, गुरुनाथ पवार, गौतम रातंबे , सेवक नागवंशी ,शिवराम उबाळे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अण्णा साळवे, दयानंद रातांबे , ॲड.शरद थोरात, सुभाष जाधव , यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


     भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ म्हणुन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरबाड तालुक्यातील आंबेटेभे येथे हजारोंच्या संख्येने माता भिमाईची 14 फेब्रुवारी रोजी जयंती साजरी होत असल्याने त्या ठिकाणी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र त्या स्मारकाचे जाणारा रस्ता का होत नाही याबद्दल आव्हाड यांनी आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेत हे सरकार राष्ट्र पुरुषांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभियान राबवुन स्मारके उभारण्याच्या घोषणा करते.मात्र त्या महापुरुषांच्या स्फुर्ती स्थळाकडे जाण्यासाठी सुरक्षित रस्ते देऊ शकत नसल्याने त्यांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करता येत नाही. आंतरराष्ट्रीय भिमाई स्मारकाच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असल्याने या भिमाई भुमितील आंबेडकरी अनुयायांना मोठ्या प्रमाणात समस्यांशी सामना करावा लागत आहे.ती समस्या 2024 मध्ये साजरा होणाऱ्या भिमाई जयंती सोहळ्यात दिसणार नाही अशी ग्वाही आव्हाड यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad