प्रतापपुर येथे आरोग्य शिबीर संपन्न
तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे पीडब्ल्यूसी इंडिया फाउंडेशन यांच्या सीएसआर माध्यमातून स्फेरुल फाउंडेशन मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ के. के .पावरा यांनी शिबिरात 121 जणांची तपासणी करत रक्तदाब, रक्त शर्करासह इतर रक्त, लघवी तपासणी करून मोफत औषधोपचार केले.
आरोग्याशिबिरानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत आभार मानले,.शिबिर यशस्वीतेसाठी सरपंच कमलबाई पावरा तसेच ग्रा प पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. स्पेरुल फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक सिद्धेश्वर गायकवाड व सचिन वानखडे यांनी परिश्रम घेतले.