अष्टदिवसीय श्री. महाशिवपुरान तथा ज्ञान यज्ञ माजी आमदार उदेसिंग पाडवी हस्ते आरती
तळोदा येथील कनकेश्वर महादेव मंदिर येथे सुरु असेलेल्या करुणालय सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने अष्टदिवसीय श्री. महाशिवपुरान तथा ज्ञान यज्ञ सुरु असता ह्या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच या प्रसंगी माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ह.भ.प.महाराज राकेशजी अग्निहोत्री आपण सीयोर चे नसून तर तळोद्याचे प्रदीपजी मिश्रा होऊन भक्तांना आपल्या वाणीतून श्री महाशिवपुरान ची कथा पठण करून सत्यस्वरूप देवादीदेव महादेवाचे दर्शन स्मरण करून देत आहात त्या बद्दल आम्ही सर्व शिवभक्त आपले आभारी आहोत ह्या कार्यक्रमा प्रसंगी मा.बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, शहर अध्यक्ष योगेश मराठे, सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशीं, पोलीस पाटील संघ प्रदेश उपाध्यक्ष बापू पाटील तसेच तालुक्यातील मोठया संख्येत शिवभक्त व महिला भगिनी उपस्थित होते.