Type Here to Get Search Results !

विधी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर



विधी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर



कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव

नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर कोळदा येथे दिनांक 6 ते 12 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या समारोप कार्यक्रम करण्यात आला. 




      कार्यक्रमाची सुरुवात प्रस्ताविकाने व अहवाल वाचन यांनी करण्यात आली. शिबिराचे अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे समारोप माननीय न्यायाधीश विजय चव्हाण, मुख्य दंडाधिकारी नंदुरबार, माननीय न्यायाधीश एन. बी. पाटील हे उपस्थित होते, त्यांच्या हस्ते उत्कृष्ट स्वयंसेवक, उत्कृष्ट स्वयंसेविका, शिस्तबद्ध स्वयंसेवक आणि उत्कृष्ट स्वयंसेवक गटप्रमुख हे चार प्रकारचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव नानासाहेब यशवंतराव पाटील तसेच अतिथी म्हणून वरिष्ठ महाविद्यालय समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकेश रघुवंशी आणि विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक प्रितम निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सात दिवसांच्या अनुभव मनोगत चि उमेश विजयसा सोनवणे विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी यांनी मांडले व आभार प्रदर्शन स्वयंसेवक कुणाल वीर यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad