Type Here to Get Search Results !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुरबाड मध्ये मेळावा संपन्न



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुरबाड मध्ये मेळावा संपन्न

 

मुरबाड दिनांक 15 प्रतिनिधी लक्ष्मण पवार


मुरबाड शहरातील जिल्हा परिषद विश्रामगृह मधील सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गट देवगाव व शिवले या गटातील पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. सदरच्या मेळाव्याला शिवसेना उप जिल्हाप्रमुख श्री. अप्पा घुडे , शिवसेना महिला आघाडी उप जिल्हाप्रमुख सौ. उर्मिला लाटे, भिवंडी लोकसभा सल्लागार समिती सदस्य श्री. विश्वनाथ बंधू सूर्यराव, युवसेना युवा जिल्हा अधिकारी श्री. अल्पेश भोईर, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख श्री. विश्वनाथ जाधव, कल्याण तालुका संपर्क संघटक श्री. संतोष शिरोशी, शिवसेना विधानसभा समन्वयक श्री. विनायक ढमने, मुरबाड तालुका संपर्क संघटक श्री. संतोष जाधव, युवासेना विधानसभा समन्वयक श्री. निलेश ठमके, मुरबाड शहर प्रमुख श्री. प्रशांत मोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.




सदरच्या मेळाव्याला कल्याण तालुका प्रमुख श्री. विश्वनाथ जाधव यांनी मार्गदर्शन करताना मतदार नोदणी कडे कार्यकर्त्यांनी भर द्यावे व त्याच प्रमाणे गटात काम करतांना आपल्यातील मतभेद बाजूला करून कार्यकर्त्यांनी शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आव्हाहन केले. त्याच प्रमाणे युवसेना जिल्हा अधिकारी श्री. अल्पेश भोईर यांनी सदरच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना आपल्या गटातील येणाऱ्या समस्या कडे लक्ष देऊन सरकार दरबारी सर्वसमान्य लोकांना न्याय देण्याच्या साठी प्रयत्न करावे असे सूचित केले त्याच प्रमाणे मुरबाड तालुक्यतील शेतकर्यांच्या जमिनीवर टाकण्यात येणाऱ्या ग्रीन झोन चा प्रश्न भविष्यात भेडसावणार आहे. त्या प्रमाणे कार्यकर्त्यांनी सावध राहून शेतकर्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहावे या प्रमाणे मार्गदर्शन केले.




शिवसेना उप जिल्हाप्रमुख श्री. अप्पा घुडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सदरच्या मेळाव्याला प्रास्ताविक मुरबाड तालुका प्रमुख श्री. संतोष विशे यांनी केले व आभार प्रदर्शन शिवसेना मुरबाड तालुका सचिव श्री. भाऊ यशवंत राव यांनी केले. तसेच जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते श्री. रामचंद्र सासे, श्री. बबन विशे, श्री. सीताराम हरड, श्री. चिंतामण गायकर हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad