वाखारी येथे छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी ता देवळा येथे उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वाखारी येथे छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रविवार दि. १९ फ्रेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा महारांजांची अभिषेक करून पुजा करण्यात येईल तसेच तसेच ८ वा महाराजांचे पुजन व अभिवादन करण्यात येईल ९ सांस्कृतीक कार्यक्रम ११ वा रक्तदान शिबीर ४ वा शिव व्याख्याते संदीप पवार यांचे व्याख्यान सा ६ वा भव्य रॅली व मिरवणूक आयोजित करण्यात आले असून
सर्व शिवभक्त शिवकन्या व ग्रामस्थ उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावीअसे आवाहन शिवजन्मो उत्सव समितीमार्फत करण्यात आली आहे