उज्वल भविष्यासाठी 10/12 वीची परीक्षा चांगले गुण मिळवून उत्तीर्ण व्हा.श्री प्रदीप वाघ
आ वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आशिर्वाद देताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की, आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या क्षणा पैकी एक क्षण जो आयुष्यात महत्वाचा असुन आपले भविष्य घडवु शकतो तो म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत मिळविलेले यश.
आपण आपल्या पाया वर उभे राहून, आपल्या परीवारा बरोबर समाजाच्या विकासासाठी मोलाचे योगदान देण्याचा प्रयत्न करवा या साठी आत्मविश्वास व कुठलाही ताण न घेता या परीक्षेला सामोरे जा असेही ते यावेळी म्हणाले श्री प्रदीप वाघ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमित नारकर मुख्य कार्यकारी अधिकारी आरोहन यांनी देखील मुलांना शुभेच्छा देताना सांगितले की,आपण पुढे जात असताना आपल्या सोबतच्या मित्रांना देखील बरोबर घेऊन चला
स्पार्क फाउंडेशन चे प्रकल्प अधिकारी श्री नितीन पिठोले यांनी सांगितले की आपण गरीबीत जरी जन्माला आलो तरी शेवटच्या काळात श्रीमंत झालो पाहिजे.
यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व शाळा आणि शिक्षकां विषयी बोलताना भावुक झाले,या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक श्री चुनिलाल पवार,शाळचे मुख्याध्यापक श्री ठवरे सर,माजी सरपंच श्री संजय वाघ, उपसरपंच श्री नंदकुमार वाघ, शालेय समिती सदस्य श्री परशुराम गवारी,आरोहन च्या श्रीमती तमन्ना
पोलिस पाटील श्री विठ्ठल गोडे, श्री पांडवीर, श्री चौधरी, श्री झुगरे सर,कांचन हमरे,कातवारे
व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते
मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी