Type Here to Get Search Results !

मुरबाड मध्ये माय लेकी वर कोयत्याने जीवघेणा हल्ला सुरक्षा रक्षकावरही हल्ला



मुरबाड मध्ये माय लेकी वर कोयत्याने जीवघेणा हल्ला सुरक्षा रक्षकावरही हल्ला


मुरबाड दिनांक 15 प्रतिनिधी लक्ष्मण पवार 


 :- शहरातील डोहळ्याचा पाडा येथिल फार्म हाऊसवर असणाऱ्या सरिता चेतन बांगर वय 32 वर्षे व श्रावणी चेतन बांगर वय.6 वर्षे या माय लेकी वर शेजारील सुरक्षा रक्षक पन्नालाल यादव यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली असुन या घटनेने संपूर्ण मुरबाड तालुक्यात खळबळ माजली सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

           याबाबत सविस्तर वृत्त असे की बारवी धरणाचे पाण्याखाली गेलेल्या तोंडली येथिल चेतन बांगर हे मुरबाड शहरा नजिक असणाऱ्या डोहळ्याचा पाडा येथिल नातेवाईकाचे फार्म हाऊसवर वास्तव्य करीत होते.बुधवारी सायंकाळी चार चे सुमारास अज्ञात इसमाने चेतन बांगर यांचे घरात प्रवेश करुन घरात असलेल्या सरिता बांगर व श्रावणी बांगर यांचे वर कोयत्याने हल्ला केला असता दोघा मायलेकींचा आक्रोश पाहून शेजारी असलेल्या फार्म हाऊसवरील सुरक्षा रक्षकाने तिकडे धुम ठोकली असता त्याला पाहून ही अज्ञात मारेकऱ्याने सुरक्षा रक्षक पन्नालाल यादव याचे हातावर कोयत्याने वार करत पसार होण्यात यशस्वी झाला.या तिघांचा आक्रोश पाहून परिसरातील लोक घटना स्थळी धावत आले .व त्यांनी या माय लेकींना मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथे पाठविण्यात आले.या घटनेची पोलिसांनी नोंद घेऊन अज्ञात मारेकऱ्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad