कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा के. व्ही. हायस्कूल जव्हार येथे शिक्षकवृंदातर्फे भव्य सत्कार सोहळा संपन्न.
जव्हार प्रतिनिधी – सुनिल जाबर
कोकण विभाग शिक्षक मतदार संघातून सर्वाधिक मताधिकाने पहिल्याच फेरीत निवडून आलेले एकमेव शिक्षक आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सर यांचा भव्य सत्कार सोहळा संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी के. व्ही. हायस्कूल जव्हार येथील कला मंदिर हॉलमध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य दिलीप उदमले यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व वारली पेंटिंग फ्रेम भेट देऊन समस्त शिक्षक वृंद, शिक्षक संघटना पदाधिकारी जव्हार- मोखाडा यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांचा शिक्षक आमदार म्हात्रे सरांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. त्यानंतर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मला आपण सर्वांनी निवडून दिल्याबद्दल सर्व शिक्षक बांधवांचे व शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
जव्हार मोखाडा या भागातील शिक्षणाच्या समस्या सोडविल्या जातील. तसेच जव्हार शहरात असलेल्या राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय येथे शौचालयाची व्यवस्था, जव्हार परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिक्षक बांधवांच्या विविध समस्या संदर्भात असलेले प्रश्न लवकरच सोडवले जातील. – आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे.
यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक बांधव, कस्तुरबा बालिका विद्यालय गोरठण शिक्षिका भगिनी यांनी यावेळी विविध समस्या संदर्भात निवेदन सादर केले.
सदर कार्यक्रमासाठी दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व गगनगिरी महाराज अनुदानित आश्रम शाळा हिरडपाडा संस्थापक दिलीपजी पटेकर, के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य दिलीप उदमले, जिल्हा अध्यक्ष शिक्षक सेना पालघर ग्रामीण विठ्ठल गोरे, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय जव्हार अध्यक्ष प्रकाशजी चुंबळे, सुनीलजी पाटील तसेच आमदार महोदयांच्या सोबत असणारे प्रतिनिधी अनंता जवळेकर, नितीन पारगावकर व इतर मान्यवर मंडळी व शिक्षक बांधव व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन जव्हार-मोखाडा तालुक्यातील शिक्षक प्रा. योगेश शंकर नंदन, प्रा. राहुल घाणे, प्रा. वैभव खंडागळे सर, अशोक तुंबडा, प्रा. प्रशांत रुकारी, चव्हान सर यांनी परिश्रम घेतले व सूत्रसंचलन रमाकांत अहिरराव यांनी केले.