सूक्ष्म नोट्स,योग्य मार्ग,प्रामाणिकपणा हे यशाचे सूत्र : मा.शरद सैंदाणे
अमळनेर प्रतिनिधि/ विशाल मैराळे
अमळनेर : सी.सी.एम.सी.विभागातंर्गत प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर येथे गोंदीया पोलीस स्टेशनचे पोलिस उप- निरीक्षक शरद छगन सैंदाणे यांनी विद्यार्थ्यांना संबोंधित करताना म्हणाले की,महाराष्ट्र लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना प्रमुख्याने तिन बाबी वर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.१.सूक्ष्म नोट्स काढणे २.योग्य मार्ग निवडणे ३.अभ्यासात प्रामाणिकपणा ठेवणे.
याचप्रमाणे सर्व पायाभूत संदर्भ पुस्तकांचे काळजीपूर्वक वाचन करणे,सर्व विषयांची नीटपणे उजळणी करणे,विषयाचे क्रम लक्षात घेणे,प्रश्न पत्रिकेची पडताळणी करणे या सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता अधिक असते असे प्रतिपादन शरद सैंदाणे यांनी केले.ते आपल्या सी.सी.एम.सी विभागाचे माजी विद्यार्थी होते,यु.जी.सी वसतीगृहात राहून २०१८ मध्ये एम.पी.एस.सी परीक्षेत ते अनु.जमाती या संवर्गातुन महाराष्ट्रात प्रथम आले होते.२०१८ पासून ते गोंदीया येथे कार्यरत आहेत.
या प्रसंगी व्यासपिठावर सी.सी.एम.सी प्रमुख डॉ.विजय तुंटे,मयुर सैंदाणे(जळ्गाव),डॉ.माधव भुसनर,प्रा.जयेश साळवे उपस्थित होते.प्रस्तुत कार्यक्रमासाठी संस्थेचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन,महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ.एम.एस.वाघ,डॉ.जे.बी.पटवर्धन,
डॉ.कल्पना पाटील,
ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.हर्षवर्धन जाधव,दिलिप दादा शिरसाठ,मेहूल ठाकरे,साहिल खाटीक,रोहित झाल्टे आदिनी सहकार्य केले.