तळोदा येथे शिवजयंती उत्सव समितीची बैठक
तळोदा : छत्रपती शिवाजी जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी नुसार मक्रानी हे होते.
बैठकीत शिवजयंती निमित्त होणाऱ्या व्याख्यान अथवा प्रबोधन कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रश्नावलींवर लहान व मोठे असे दोन गटांमध्ये शालेय विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारक चौक येथे शिव जयंतीचा दिवशी सामूहिक प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीला मधुकर रामोळे गणेश शिवदे हिरालाल कर्णकार अनिल मगरे निंबा गुरव घनश्याम सोनार प्रवीण जोहरी बाळू माळी अजित ढवाळे सुनील परदेशी निलेश गायकवाड प्राध्यापक एस एम जावरे घनश्याम चौधरी, प्राध्यापक पी आर बोबडे,नथू माळी दीपक सूर्यवंशी बन्सीलाल तांबोळी लक्ष्मण बच्छाव संतोष केदार सुनील पिंपळे निसार आली मकरानी महेंद्र बागुल डॉक्टर गणेश सोनवणे मणिलाल पटेल संदीप मुके सुधाकर मराठे हंसराज महाले, आदीसह विविध समाज अध्यक्ष उपस्थित होते. सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी तर आभार डॉ देविदास शेंडे यांनी मानले.