विद्यार्थी सशक्तिकरण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्याध्यापकांचा सन्मान
तळोदा:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी सशक्तीकरण योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून न्यूक्लिअस बजेट योजने अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नविन आधार कार्ड काढून देणे, आधारकार्ड दुरुस्ती,जातीच्या दाखला काढून देणे कामासाठी केंद्रीय योजने अंतर्गत विद्यार्थी सशक्तीकरण विद्यार्थी सशक्तीकरण अभियान राबविण्यात आले आहे.या अभियानंतर्गत शासकिय व अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला.
मागील वर्षभरापासून हे अभियान राबवण्यात येत आहे. हि योजना राबविण्यासाठी अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचा प्रकल्प कार्यालयाकडून प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे,कृष्णा कोकणी,एम एफ पावरा, शिक्षण विस्तार अधिकारी बी आर मुंगळे,सतपालसिंग वळवी,सेतू समन्वयक वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोठार येथिल अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेचे प्राथमिक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी एम पाटील, तलावडी आश्रमशाळेचे पी.बी.साळुंखे, शिक्षक अमोल पाटील, पेचरीदेव आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक जगन शिंदे, माध्यमिक मुख्याध्यापक कालिदास कोठावदे, नर्मदा नगर आश्रमशाळेचे भारती पावरा,श्री.भोईटे,सलसाडीचे मनोज कुरकुरे,मोरंबाचे एस आर चौधरी,तोरणमाळचे प्रदीप पाटील, आदींसह तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील अनुदानित व शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सेतु चालक छगन माळी, महेंद्र मराठे, जयश्री गुरव,सुनील रहस्ये, प्रवीण पावरा,मंगेश पावरा,लतेश मोरे, आदीं उपस्थित होते.