संविधान हे प्रत्येक भारतीयांचे हृदय -प्रा राजू पवार
ग्राम विकास मंडळ मोलगी संचलीत प्रज्ञा कला वरिष्ठ महाविद्यालय मोलगी रासेयो विभागाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर मौजे कंजाणी या ठिकाणी आयोजीत करण्यात आले होते.
शिबिरांच्या बौध्दिक सत्रात प्रा डॉ संजय महाले, तसेच संजय पावरा आणि प्रा राजू पवार यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
त्यात प्रा राजू पवार अर्थशास्र विभाग प्रमुख यांनी " संविधान समज गैरसमज व जनजागृती " या विषयावर मनोगत व्यक्त करतांना सांगितले की भारतीय राज्य घटनेचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केवढ अनूसूचित जातीजमाती साठीच कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत असे नव्हे तर जन्माला येणाऱ्या प्रत्येक अपत्या पासून मुत्यू पावलेल्या प्रत्येक भारतीय नागरिका साठी संविधानात कायदे केलेले आहेत ۔
ते म्हणाले की राजेशाही व्यवस्थेत एकट्या महिलेला कुठे ही जाता येत नव्हते तिला सतत परकिय शत्रु पक्षांची परकिय व्यक्तीची भिती वाटायची परंतु आज एकटी महिला पुर्ण देशात कुठे ही जावू शकते व कुठे ही वास्तव्य करु शकते कारण तिचे संविधानातील कायदे तिचे रक्षण करतात
त्याच प्रमाणे पुर्वी बलाढ्य व ताकदवर लोक अबला किंवा दुर्बल लोकांची संपत्ती लुटुन घेत असत , परंतु आज संविधानाच्या कलम 31 नुसार प्रत्येक भारतीय व्यक्तीस मालमत्तेचा हक्क दिला आहे, तसेच सर्वाना आपआपल्या धर्मानुसार कलम 25 ते 28 नुसार धार्मिक हक्क प्रदान केले आहेत
त्यात महत्वाचे म्हणजे व्यक्ती गरिब असो या धनाढ्य दोघाच्या मतांचे महत्व सारखे आहे
म्हणून भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे ह्रदय आहे त्यामुळे ज्या लोकांनी संविधान वाचले नाही ज्यांना संविधानाच्या कायद्या विषयी माहिती नाही ते लोक संविधाना विषय गैरसमज निर्माण करुन संभ्रम निर्माण करतात अशा लोकापासून आपण सावध राहिले पाहिजे
संविधानमुळे आपला देश एकसंघ व एकजुट आहे अशी महत्वपुर्ण माहिती त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली
तसेच प्रा डॉ संजय महाले यांनी " प्लॅस्टीक निर्मुलन जनजागृती " या विषयावर मार्गदर्शन केले
तसेच संजय पावरा यांनी "आदिवासी संस्कृती व आदिवासी जननायक " याविषयावर मार्गदर्शन केले
यावेळी प्रा राजू पवार यांनी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा शिवराम गायकवाड यांना भारतीय संविधान हा ग्रंथ भेट दिला तसेच महिला कार्यक्रमाधिकारी प्रा मिनाक्षी पाडवी यांना "आदिवासी क्रांतीकारी जननायक व प्रा धिरेन्द्र पाटील यांना शिवजागर हे ग्रंथ भेट दिले.
कार्यक्रमासाठी प्रा शिवराम गायकवाड, प्रा धिरेन्द्र पाटील , प्राध्यापिका मिनाक्षी पाडवी, शितल पाटील, नरेश वसावे, मनेष पाडवी, कालुसिंग पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते.