आमलाड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने व्याख्यान
तळोदा:- विद्यासहयोग बहुद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यालय आमलाड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन व्ही मराठे होते तर शिवचरित्र व्याख्याते म्हणून किरण चव्हाण (सीआयएसफ) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती सारिका चौधरी व श्रीमती सुनिता चव्हाण उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख शिवचरित्र वक्ते किरण चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, साहसी कुशल सुष्म नियोजनबंध युद्ध नीती, स्वराज्य स्थापना, सर्व समावेशक चारित्र्यशील राज्य कारभार याविषयी माहिती दिली
यावेळी आर बी कुवर, ए ए शेंडे, एस ए सुर्यवंशी, बी बी भामरे, डी एन गिरासे, आर के पाडवी, श्रीमती आशा जाधव उपस्थित होते कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वाय एस मासुळे यांनी केले.