सापडलेले पाकीट व रोख रक्कम परत केली वाचमन कृष्णा मराठे यांच्या प्रामाणिकपणाने कौतुक
तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्याआठवडे बैल बाजारात पैशाचे पाकीटात 82 हजार रु रोख सापडले ते मूळ मालकास केले परत वाचमन कृष्णा (छोटू)यांच्या प्रामाणिकपणाने कौतुक होत आहे.
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दिं 17 रोजी येथे बैलचा आठवडे बाजार भरला असता त्या बाजारात रोहीदास नथा पाटील रा.शिरसमनी ता.पारोळा यांचे पाकीट हारले असता ते पाकीट बाजार समितीचे वाचमन कृष्णा (छोटू) पांडुरंग मराठे याना सापडले त्यांनी बाजार समितीचे सहा.सचिव हेमंत चौधरी यांचा कडे दिले . त्यांनी रोहीदास पाटील यांना मोबाईल ने संपर्क केला. व त्यांना सपूर्त केले त्या पाकीट मध्ये 82000/- इतकी रक्कम होती ती परत केली कृष्णा उर्फ छोटू मराठे यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.