कांद्यासह इतर शेती मालाच्या हमी भावासाठी, मा.खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन!
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
कांदा कापुस-सोयाबिन भाव वाढ, व्हावी अतिवृष्टीची नुकसान भरपाई, मिळावी विमा कंपनिने रोखलेला पिक-विमा, तसेचकृषी पंपाला दिवसाला विज, दयावी थकित उसाची एफआरपी प्रोत्साहनपर अनुदानाची थकित रक्कम, मिळावी शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळ, व्हावे बोंडअळी मुक्त बियाणे व बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशाआदी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना २२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजु शेट्टी यांनी दिला आहे.
मा.राजु शेट्टी यांनी पुकारलेल्या या आंदोलनात स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्त्ये तसेच जिल्ह्यातील ,कांदा उत्पादक शेतकरी व शेतमजूरांनी ताकतीने सहभागी व्हा! असे आवाहन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप जगताप यांनी केले असून नाशिक जिल्ह्यात सद्या लाल कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे, कांद्याचे भाव ४०० ते ९०० रुपयांच्या खाली आले आहेत , केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करून ग्राहक हित जोपासायपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन ज्यास्तीत ज्यास्त कांदा निर्यात करण्यासाठी पावले उचलने आवश्यक आहे, त्यासाठी नोटीफिकेशन जारी करण्यात यावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख श्री कुबेर जाधव तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजु शिरसाठ यांनी केले आहे