चांदूरबाजार येथे विविध उपक्रमांतून शिवजयंती उत्सव संपन्न!
चांदुर बाजार / मृत्युंजय आवारे :- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छञपती शिवराय स्मारक समिती व वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद व समविचारी संघटनांच्या वतीने उत्साहात संपन्न झाली.
यावेळी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिव मशाल उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी छञपती शिवरायांना मशाली पेटऊन अभिवादन करण्यात आले.
त्याचप्रमाणे शिवजयंती च्या दिवशी सकाळी सामूहिक शिवपूजन सर्व मान्यवर पाहुण्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी तहसीलदार धीरज स्थूल, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, ठाणेदार अशोक जाधव साहेब, सहाय्यक ठाणेदार नरेंद पेंदोर, सहाय्यक गटविकास अधिकारी आमझरे, गटशिक्षणाधिकारी वकार अहमद आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे नंदकुमार बंड, जेष्ठ विचारवंत पंकज आवारे, जगदंब पब्लिक स्कूल चे विनोद कोरडे,मराठा सेवा संघाचे संतोष कोठाळे, प्रमोद ठाकरे, नितीन देशमुख, मंगेश चौधरी अनिस ज्ञानेश्वर डवरे, पत्रकार मदन भाटे ग्रामपंचायत चे उपसरपंच मनीष एकलारे, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा स्मारक समिती संयोजक डॉ तुषार देशमुख, निखिल काटोलकर, ग्राम पंचायत सदस्य, नगरसेवक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद च्या वतीने तालुकास्तरीय शिवचित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधे पूर्ण तालुक्यातून एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी झालेल्या सर्व उपक्रमातून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. सायंकाळी स्व. नितीन कोरडे मित्र परिवार च्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रांगभरण स्पर्धेतील विजेत्यांना आमदार मा.बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती चे प्रतिक काटोलकर, अक्षय पांडे, श्रेयस बर्वे, रीद्धेश ठाकरे, संयोग निंभोरकर, मृत्युंजय आवारे,पियूष बर्वे, पवन राऊत,ऋषिकेश पोहकार, निखिल ठाकरे, अजिंक्य वाकोडे, ऋषभ गावंडे, संतोष किटूकलेआदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तुषार देशमुख तर आभार संतोष कोठाळे यांनी मानले.