महाराष्ट्र गुजरात राज्यातील कोकणा,कोकणी,कुकणा आदिवासी समाजाची महासंमेलन नियोजन सभा संपन्न!
जव्हार - दिनेश आंबेकर.
रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी, वणी येथे राजबन हॉल बिरसा मुंडा चौक येथे आयोजित करण्यात आली. आदिवासी कोकणा समाजातील संस्कृती, आपले हक्क अधिकार आणि येणाऱ्या समस्या सोडविण्याच्या उद्दात हेतूने आपला समाज मागे मागे न राहता ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी हेतूने सर्व शिक्षित वर्ग एकत्र या सभेसाठी पालघर, ठाणे, नाशिक, धुळे दादरा नगर हवेली गुजरात (अहवा -डांग ) तसेच विविध जिल्हातील नोकरी निमित्त असलेले आदिवासी समाज बांधव उपस्थिती राहिले.
यावेळी कणसरी पूजन, कोकणा समाजातील देवाजी राऊत, बिरसा मुंडा, शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज फोटोस प्रतिमापूजन करुन सभेस प्रारंभ करण्यात आला.
इतर महाराष्ट्र, गुजरात राज्यातून आलेले कोकणा, कोकणी, कुकणा आदिवासी समाजातील आलेले मान्यवरांचे स्वागत नाशिक जिल्हातील कोकणा, कोकणी आदिवासी समाज बांधवांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून स्वागत कारण्यात आले.