कळमसरे येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले आरोपी अटकेत
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत अत्याचार केल्याने मारवड पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे सविस्तर वृत असे. कळमसरे गावातली अनुसूचित जातीच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी वय 16 वर्ष दि. 5 रोजी फुस लावून पळवून नेल्याची मारवड पोलीस स्टेशन ला मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी कार्यवाही करत तीन दिवसात पोलिसांनी मुलीला शोधून काढले व तिची जळगांव येथिल सुधारगृहात रवानगी केली होती व तेथे पीडित मुलीने दिलेल्या माहिती नुसार एपीआय जयेश खलाने यांनी व पोलिस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांनी तपास चक्रे फिरवुन पीड़ित अल्पवयिन मुलीला फूस लावुन पळवुन नेत अत्याचार केल्याने अमलनेर येथील 20 वर्षीय निखिल संतोष चौधरी रा. बाहेरपुरा याच्या विरुद्ध दी. 10 रोजी मारवड़ पोलिस स्टेशन ला अल्पवयीन मुलीला कुटुंबी यांच्या रखवलितुन फूस लावून पळवुन नेत अत्याचार केल्यापकर्णी विविध दोन कलमानव्ये आणि बालकांचे लैंगिक अपराधपासुन संरक्षन कायद्याचे विविध तीन कलम व अनुसूचित जाति जमाती अधिनियम 1989 च्या विविध तीन अश्या एकुन आठ कलमान्वये गुन्हा नोद केला असुन आरोपिस अटक केली आहे आरोपीस सायंकाळी अमलनेर पोलिस कोठडीत रवानगी केली आहे व पुढिल तपास उपविभागिय पुलिस अधिकारी राकेश जाधव करित आहेत