शासकीय ईतमामात फौजदार दारासिंग पावरा यांच्या अंत्यविधी
तळोदा : तालुक्यातील धवळीविहिर येथील मूळ रहिवाशी पोलीस उपनिरीक्षक दारासिंग पावरा यांचे अपघाती निधन झाले.त्यांचे पार्थिवावर यांच्या शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक दारासिंग पावर आहे रायगड जिल्हा पोलीस दलाल कार्यरत होते.अलिबागजवळ कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने वाहनाने मागून धडक देवून झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले.त्यांचे पार्थिव शुक्रवारी मूळ गावी धवळीविहिर येथे आणण्यात आले होते.धवळीविहिर येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर शासकिय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यविधी प्रसंगी नंदूरबार जिल्हा पोलिस दलाच्या सलामी पथकाने अखेरची मानवंदना दिली.
यावेळी पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत,तळोदा पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, यांच्यासह रायगड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.