टाकरखेडा संभु चे कनिष्ठ अभियंता सेवेतून बाहेर ...
प्रतिनिधी वैभव भूजाडे भातकुली
मीटर उपलब्ध असून सुद्धा नवीन वीज जोडण्यास टाळाटाळ करणे , वीज ग्राहकांचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन न उचलणे या सर्व गोष्टी लक्षात घेत अमरावती ग्रामीण अंतर्गत टाकरखेडा संभु येथील महावितरण मधे असलेले कनिष्ठ अभियंता निलेश भस्मे यांना कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांनी सेवेतून निलंबित केले.भस्मे यांच्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या . तक्रारी च्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी अचानक पणे टाकरखेडा संभु येथील महावितरण मधे भेट दिली असता त्यांना कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालय मधे 10 मीटर असून सुद्धा 8 ग्राहकांच्या वीज जोडण्या प्रलंबित , कृषी पंपाचे 2 अर्ज प्रलंबित आढलुन आले.
वरिष्ठांच्या व ग्राहक सेवेशी संबंधित दिलेले आदेश न ऐकणे , तसेच ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ते कुठलीही माहिती देत नसल्याचे स्पष्ट झाले.
निलेश भस्मे हे शाखा प्रमुख म्हणून काम करत असताना स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य हे विसरून नागरिकांना त्रास द्यायचं काम करणे , कामात निष्काळजीपना करणे या अनेक कारणांमुळे त्यांना आपली कर्तव्य वरून काढून टाकण्यात आल्याचं समजते .