प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवारातर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शन
महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ओम शांती परीवारतर्फे केदारनाथ शिवलिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील सिंधी कॉलनी भागातील गुरुनानक मंगल कार्यालयात दि. 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना प्रदर्शन पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते झाले.
प्रतिवर्षी महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सत्यम शिवम सुंदरम चैतन्य केदारनाथ शिवलिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नंदनगरीत प्रथमच होणाऱ्या या मेळावानिमित्त भाविकांनी होलोग्रम लेझर शोचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की,संस्कारशील समाजातून चांगला संदेश मिळावा. प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारा मार्फत समाजात जनजागृतीचा चांगला उपक्रम असून सुसंस्कृत समाज निर्मितीसाठीओम शांती परिवाराचे महत्त्वाचे योगदान आहे.असे खासदार गावित म्हणाल्या.उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका रेश्मा मोहन खानवाणी,तसेच उद्योजक मोहन खानवाणी,संचालिका विजया दीदी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके योगिता दीदी यांनी केले.
दरम्यान सिंधी कॉलनीतील गुरुनानक मंगल कार्यालयात शनिवार आणि रविवार दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चैतन्य केदारनाथ शिवलिंग दर्शन होलोग्राम लेझर शो भाविकांसाठी खुला करण्यात आला असून या प्रदर्शन देखाव्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवाराच्या नंदुरबार शाखेतर्फे करण्यात आले आहे.