मोखाड्यातील तब्बल ९३ किमीच्या रस्त्यांची वाताहात जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा प्रताप
जिप अध्यक्ष प्रकाश निकम यांची कारवाईची मागणी
मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यात हर घर जल या या उद्घघोषणेच्या नुसार महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून तब्बल अडीच कोटींच्या आसपास खर्च करून गावपाड्यांत पाणी पोहचवण्याचे काम सुरू झाले आहे मात्र हे करताना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परीषद बांधकाम विभाग यांची कसलीही परवानगी न घेता फक्त जिल्हा परीषद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ९३ किमी रस्त्याची अक्षरशः दुर्दशा करण्यात आली असून थेट डांबरी रस्ते उखडून टाकले आहेत यामुळे पावसाळ्यात मोठे अपघात होणार असून रस्तेही वाहुन जाण्याची भिती आहे याबात जिल्हा परीषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने याविषयाची लक्षवेधीही झाली असून नुकतेच निकम यांनी हे काम करणाऱ्या ईगल कंट्रक्शन कंपनीचे ठेकेदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे यांच्यासोबत पाहणी केली आहे.
मोखाडा वैतरणा धरणावरून गावपाड्यांजवळ बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकी पर्यंत पाणी पोहचवण्यासाठी २२० कोटीहुन अधिक रकमेचे काम ईगल कंट्रक्शन या कंपनीला मिळाले आहे अशावेळी खोदकाम करतान रस्त्यापासून ५ ते १० मीटरचे अंतर ठेवणे आवश्यक असतानाही तसे केले नाही जर अशी जागा मिळाली नाही तर संबंधित विभागाची परवानगी घेवून काही अंशी असे रस्ते खोदता येतात मात्र कसलीही परवानगी न घेता कोणालाही न जुमानता थेट रस्त्यावरील डांबरउखडले जाईल अशा प्रकार खोदकाम केले आहे तर काहि ठीकाणी नियमात नसताना पॉकलेन थेट डांबरीरस्त्यावर चालवण्यात आला आहे.याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रश्नाची येत्या अधिवेशनात लक्षवेधी करण्यात येणार असून तशी प्रश्नावली जिल्हा परीषद पालघरला पाठवण्यात आली आहे याप्रश्नाना उत्तर देताना जिल्हा परीषदेची कसलीही परवानगी मागीतली नसून काही दिवसांपुर्वी म्हणजेच रस्ते खोदून झाल्यानंतर त्रोटक पद्धतीचे पत्र पाठविण्यात आल्याचे जिप पालघरने लेखी सांगितले असून यावेळी परवानगी मागताना विस्तृतपणे सविस्तर पत्र लिहून पाठवावे असे सांगण्यात आल्यानंतरही यानंतर कसलीही परवानगी मागितलेली नाही यामुळे हे खोदकाम अनधिकृत असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे असून तसे लेखी कक्ष अधिकारी यांना त्यांनी पाठवले आहे.
याबाबत जिप अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही मोर्हडा निळमाती दांडावळ याभागाची प्रत्यक्ष अधिकाऱ्यांबरोबर पाहणी करून सत्य दाखवून दिले असून ठेकेदार आणि संबधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा ईशारा दिला आहे.
"आम्ही या रस्त्यांची पाहणी केली असून खोदलेले रस्ते पुर्वरत करून देण्याची जबाबदारी आमची असून आम्ही ते करून देणार आहोत.तशा सुचना संबधीत एजंसीला आम्ही केल्या आहेत.
तन्मय कांबळे
कार्यकारी अभियंता,महराष्ट्र जीवन प्राधीकरण
" आज मोखाडा तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे जवळजवळ 93 किलोमीटरचे रस्ते उखडून टाकले आहेत याची तक्रार मी स्वतः केली होती याची दखल घेऊन एमजीपीचे कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे व ठेकेदार आणि स्वतः माझ्याबरोबर चाळीस किलोमीटरच्या रस्त्याची पाहणी केली व त्यांनी मोखाडा तालुक्यातील खराब झालेले रस्ते व खड्डे आम्ही पूर्वत करून देऊ असे लिखित स्वरूपात देण्याचे कबूल केले आहे.
प्रकाश निकम
अध्यक्ष जिल्हा परीषद पालघर