बी.बी.एस. इंटरनॅशनल स्कूल झाप जव्हार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की सगळ्यांच्या ह्रुदयात बसणारे नाव त्यांचा इतिहास वाचल्यावर अंगाला काटे आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचे मान सन्मान घडलेला इतिहास एक ऐतिहासिक प्रसंग प्रत्येकाचे मन रमुन जाईल असे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास आहे.
कित्येक किल्ले त्यांनी आपल्या प्रजाच्या साहाय्याने जिंकून आणि आपल्या महाराष्ट्राचे स्थान उंचावले तसेच पूर्ण महाराष्ट्र मध्ये जिथे गड तिथे महाराजांचे वास्तव्य स्थान.! आणि म्हणून असे हे महाराज आज ४०० वर्षे होऊन गेले तरी सर्वांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत आणि या महाराजांच्या आज विविध ठिकाणी कार्यक्रम केले जातात त्यांची जयंती साजरी केली जाते अश्याच प्रकारे आज जव्हार पैकी झाप या गावामध्ये बी. बी. एस. इंटरनॅशनल स्कूल झाप जव्हार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
ही जयंत साजरी करत असताना या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मोलाची माहिती दिली. या शाळेतील शिक्षक हे नेहमी मुलांना विविध कार्यक्रम घेऊन आणि मुलांना मार्गदर्शन करत असतात.
हे मार्गदर्शन करत असताना उपस्थित वर्ग शिक्षक श्री. दीपक खानजोडे सर, श्री. मनोज वारा सर, श्री. देवा गवारी सर, श्री म. विजया वातास मॅडम, श्री म . मंजुळा वारा मॅडम आणि विलास दादा तसेच सविता मावशी असे सर्व शालेय कर्मचारी उपस्थित राहून आणि हा कार्यक्रम घेण्यात आला.