दिनांक 11/8/2024 रोजी महिम ता.सांगोला जि.सोलापूर येथे महिम गावचे युवा नेतृत्व विजयसिंह मरगर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजी बापु पाटील व सौ.रेखाताई शहाजी पाटील तसेच सागर पाटील होते.व्यासपीठावर आमदार शहाजी पाटील गटाचे नेते मंडळी व वेगवेगळ्या संघटनेचे व पक्षाचे नेते मंडळी उपस्थित होते. विजयसिंह मरगर हे सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणे.त्यांना मदत करणे तसेच सर्व क्षेत्रातील व्यक्ती ना मैत्री सारखे जपणे ह्या सर्व बाबीचा विचार करून त्यांचे सामाजिक कार्य बघुन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन हटकर समाज महासंघाचे वतीने *शुरवीर संभाजी करवर पुरस्कार* प्रमुख पाहुणे च्या उपस्थितीत देण्यात आला.यावेळी भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय भुसनर,राजु मरगर, जयसिंग पाटील, सोमनाथ मरगर, सुरेश पाटील, मारूती भुसनर, नामदेव पाटील, आर्ट ऑफ लिव्हींगचे विजय मरगर, राजकुमार बेलदर,विनायक पाटील,राजु भुसनर तसेच युवा नेते विजयसिंह मरगर यांच्या वर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.